क्राईम बिट

पोलिसाने लग्नाचं आमिष दाखवत केले अत्याचार ; संसार मात्र दुसरी सोबतच

Share Now

लग्नाचं आमिष देऊन पोलीस जवानाने महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिला देखील पोलीस कर्मचारी आहे, तर दुसरीसोबतच संसार त्याने संसार मांडला होता.

पंकज मगर असे या आरोपी पोलीस जवानाचे नाव असून तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. जालना जिल्ह्यात ही सदरील घटना घडली आहे. पीडित महिला ही जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहे. तर आरोपी हा पुणे राज्य राखीव पोलीस दलाचा जवान आहे.

पीडित महिला आणि आरोपीची ओळख औरंगाबाद शहरातील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात झाली होती. ओळखीचं रूपांतर कालांतराने प्रेमात झालं. पीडित महिला ही जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नोकरीला लागली. तर आरोपी पंकज मगर हा नंतर पुणे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक २ येथे रुजू झाला.

१० मे २०१८ पासून ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत आरोपी जवान पंकज मगर याने लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेच्याच शासकीय निवासस्थानी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

पीडितेने लग्न करण्याची मागणी लावून धरली होती परंतु आरोपी पंकज मात्र टाळाटाळ करत होता. पीडित महिलेला संशय बळावला पंकज बाबतीत चौकशी केली असता त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे समोर आले.

याप्रकरणी पीडित महिला पोलिसाच्या तक्रारीवरून पंकज मगर विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात अट्रोसिटी, बलात्कारसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वडते हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *