क्राईम बिट

भावानेच केला घात,अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Share Now

सुरत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीतील कस्तुरबा नगर येथे २० वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. त्यात आता हि धक्कादायक घटना घडली आहेअल्पवयीन मुलीसोबत गँगरेप झाल्याची घटना समोर आली आहे. या घडलेल्या घटनेतील मुख्य आरोपी पीडितेचा मानलेला भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे, या नराधमाने आधी मुलीला कुंकू भरलं त्यानंतर मित्रासोबत सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले . यातील पीडितेने सुरतच्या डिंडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

या घडलेल्या घटनेत असं सांगितलं जाते कि, पीडितेचे आई वडील आरोपी सोबत लग्न लावूं देण्याच्या तयारीत होते. या निर्णयाला पीडितेचा विरोध होता तिला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिला शिकून मोठं होण्याचं स्वप्न होत. यासाठी पीडितेने नातेवाईक असलेल्या तरुणासोबत दीड वर्षाआधी सुरातला पळून आली तेव्हापासून ती तरुणासोबत भाऊ म्हणून राहत होती. या मानलेल्या भावाने अचानकपणे पीडितेला कुंकू भरवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *