पश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याची हत्या ; १० जणांना जिवंत जाळलं
पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील राम पुराहाट येथे टीएमसी नेत्यांची हत्या करण्यात आली. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि हिंसाचार झाला त्यात संतप्त जमावाने १० ते १२ घराचे दरवाजे बंद करून आग लावली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही हिंसाचाराची घटना सोमवारी रात्री घडली असून यात १० ते १२ घरे जाळून राख झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राम पुराहाट येथे टीएमसी नेत्यांची हत्या झाल्याच्या कारणांमुळे जमावाने घरे पेटवल्याची चर्चा आहे.
pic credit – ANI
घटना कल रात की है,10-12 घर थे जो जल चुके हैं, कुल 10 लोगों की मृत्यु हुई है जिनकी बॉडी रिकवर की गई है। एक ही घर से 7 लोगों के शव निकाले गए हैं: रामपुरहाट में तृणमूल नेता की हत्या के बाद कथित रूप से भीड़ द्वारा घरों में आग लगाने से कई लोगों की मृत्यु पर दमकल अधिकारी, बीरभूम pic.twitter.com/66ptPD3NXK
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022