news

TET Exam Scam – अश्विन कुमारकडून कोट्यवधींचा घबाड जप्त.

Share Now

पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परिक्षेबाबत सुरू असलेली चौकशी यात अनेक जण असल्याचे समोर येत आहे, त्याचबरोबर करोडाचा आर्थिक व्यवहार देखील बाहेर आला आहे. मागील आठ दिवसात तुकाराम सुपे यांच्याकडे जवळपास तीन कोटी रुपये आणि काही सोन्याचे दागिने सापडले आहेत. केवळ तुकाराम सुपे नाही तर त्याचे सहकारी यांच्याकडे लाखोंचं घबाड सापडलं आहे.

पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून २४ किलो चांदी आणि २ किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे.

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला २० ते २१ डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. २०१७ मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.

या प्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे यांच्याकडून पुणे पोलिसांच्या वतीनं रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. तुकाराम सुपेचे आणखी ५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तुकाराम सुपेच्या मित्राकडून ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. २४ तासात सुपेचे ६३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. तुकाराम सुपेकडून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *