राजकारण

शरद पवार यांच्यावर अभद्र शब्दांत टीका होताच, अजित पवार यांचा थेट सदाभाऊंना फोन

मुंबई: आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या चेहऱ्यावर केलेली टीका आणि त्यांच्या अभद्र वक्तव्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात टीकेची लाट आली आहे. अनेक नेत्यांनी खोत यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विधानावर आपली नाराजी व्यक्त केली असून, त्यांना थेट फोन करून त्यांचे वक्तव्य धाडसाने निषेधित केले आहे.

या नोकऱ्यांसाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, घ्या जाणून

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण, सुसंस्कृतपणे बोलण्याची कला, आणि कंबरेखालचे वार कसे नको असतात, हे शिकवले होते. त्यांनी नेहमीच आरोप-प्रत्यारोप मांडण्याची योग्य पद्धत शिकवली. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब आणि विलासराव देशमुख यांच्यासारख्या मान्यवरांनी या पद्धतीचे पालन केले. परंतु, सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केले, ते संपूर्णपणे निषेधार्ह आहे. त्यावर मी कालच तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.”

“माझ्या निषेधानंतर मी थेट खोत यांना फोन करून त्यांना सांगितलं की, ‘तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे बंद करा.’ वैयक्तिक पातळीवर असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे.”

हा प्रकार ‘विनाशकाले विरपित बुद्ध’ सारखा
अजित पवार पुढे म्हणाले, “राज्यात अनेक राजकीय नेते येतील, ज्यांची विचारधारा वेगळी असू शकते. पण मत मांडताना काहीतरी ताळमेळ असायला हवा. हे अतिशय निंदनीय आहे. हा प्रकार ‘विनाशकाले विरपित बुद्ध’ सारखा आहे. खोत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हा प्रकार परत होणार नाही.”

अजित पवार यांनी खोत यांना स्पष्टपणे सांगितले, “तुम्ही जे बोललं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. वडीलधारी लोकांबद्दल अशा प्रकारे बोलणे महाराष्ट्र सहन करत नाही. हे आम्ही मान्य करत नाही.” अशाप्रकारे, अजित पवार यांनी खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधाची कठोर प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांना भविष्यकाळात अशा प्रकारची भाषाशुद्धता पाळण्याचा सल्ला दिला आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *