शरद पवारांना कोरोना संसर्गाची माहिती मिळताच त्यांना मोदींनी केला फोन म्हणले…
मुंबई : राष्ट्रवादी कँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर राजकीय क्षेत्रात अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. असे स्वतः शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला फोन करून माझ्या प्रकृतीची विचारणा केली. मी त्यांचे आभारी आहे”
Prime Minister Shri Narendra Modi ji called to enquire about my health. I am thankful for his concern and good wishes.@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
दरम्यान पवारांनी स्वतः ट्विट करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली . काळजी करण्याचे कारण नाही मी उपचार घेत आहे असे पवार म्हणले. त्यांनी ट्विट मध्ये सांगितले, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे त्यांनी सांगितले.