प्रेयसीसोबत वाद प्रियकराने केला दगडाने ठेचून खून
यवतमाळ शहरालगतच्या लोहारा एमआयडीसी भागात प्रेम युगलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून पावर हाऊस परिसरात एक युवक रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असल्याची माहिती लोहारा पोलिसांना मिळाली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहचता त्याठिकाणी त्याने प्रेयसीला दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना दि ३ मार्च रोजी सकाळी घडल्याचे समोर आले.
आस्था सुरेश तुंबडे मृत मुलीचे नाव असून गुरुकृपा सोसायटी उमरसरा येथील रहिवासी आहे. तसेच गंभीर जखमी झालेला तरुण शुभम अशोक बकाल शिंदे नगर येथील रहिवासी आहे.शुभम आणि आस्था दुचाकी घेऊन लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी दोघांमध्ये नेमका कशावरून वाचायला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे तिच्या चेहऱ्यावर दगडाने घाव घातले. नंतर शुभमने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापली त्यानंतर गळ्या वरही वार करून घेतले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेला शुभम मुख्य रस्त्यावर आला आणि त्याला योगेश नावाच्या व्यक्तीने त्याला बघितले आणि लाहोरा पोलिसांना त्याने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच शुभमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर आस्था ही जागेवरच मृत पावली.
सुरुवातीला प्रेमयुगलावर हल्ला केला असेल अशी शंका होती मात्र परिसरात शुभमची दुचाकी आढळून आली तसेच आस्थाची शाळेची बॅग आणि इतर साहित्य देखील आढळून आले. यावरून दोघांची ओळख पटली त्यांच्या कुटुंबातील लोकांना याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी आस्ताच्या वडिलांनी शुभमच्या विरोधात ३०२, ३०९ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.