श्री शिरीष राणे यांची भा.ज.प कामगार मोर्चा चित्रपट आघाडीच्या महाराष्ट्र समन्वयक पदी नियुक्ती ..
११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालय,नरीमन पॉईंट, मुंबई येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ तसेच नवनियुक्त प्रदेश कार्यकारीणीची बैठक पार पडली.या कार्यक्रमात श्री.शिरीष राणे यांची समन्वयक महाराष्ट्र चित्रपट कामगार आघाडी पदावर नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास श्री. विक्रांतजी पाटील, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांची विशेष उपस्थिती होती. मा. विजयभाऊ हरगुडे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले. श्री. समीर दीक्षित भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा संलग्न चित्रपट आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांनी याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मधुमेह: हातावर अशी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा समजून घ्या चिन्ह…
याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा,अभिनेत्री किशोरी शहाणे, नाटक निर्माते व समाज सेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदा तज्ज्ञ जुबी मॅथ्यू ,प्रभारी श्री. सत्यवान गावडे, सरचिटणीस प्रीति जोसेफ विक्टर, सरचिटणीस गीतांजली ठाकरे, सरचिटणीस संचित यादव, श्री. शौकतखा रज्जाकखा पठाण, चंद्रकांत विसपुते,इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Maharashtra Assembly Live ( 13-12-2023 ) #wintersession2023
तसेच धनश्री दामले यांनी सुंदर निवेदन केले याप्रसंगी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. अभिनेत्री किशोरी शहाणे यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Latest:
- कोल्ड प्रेस्ड ऑइल आणि रिफाइंड ऑइलमध्ये काय फरक आहे? कच्च्या घाण्यापेक्षा किती वेगळे आहे?
- संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने घेतला पुढाकार, शेतकऱ्यांकडून 2 लाख टन कांदा खरेदी करणार.
- अवघ्या ५ मिनिटात जाणून घ्या मातीचे आरोग्य, शेतकऱ्यांसाठी खास यंत्र तयार.
- आता फिंगरप्रिंट न देताही आधार बनवता येणार, सरकारने ही नवी सुविधा सुरू केली आहे