क्राईम बिटमहाराष्ट्र

हत्येचा बदला घेण्यासाठी आणखी एक हत्या? बस स्थानकातच घडली थरारक घटना

Share Now

यवतमाळमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका युवकाची हत्या करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा (Darvha, Yavatmal) येथील बस स्थानकाच्या जवळ थरारक हत्याकांड घडलं. हाती आलेल्या माहितीनुसार, धारदार शस्त्रासोबतच गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) अधिक तपास केला जातोय. विशेष म्हणजे ही हत्या बदल्याच्या भावनेतून करण्यात आली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आलाय. चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरु केलाय.

भरड धान्य आरोग्य आणि निसर्गासाठी आहे फायदेशीर, कमी पाण्यात होईल शेती

यवतमाळच्या दारव्हातील बस स्थानकाजवळ सुंदीप तोटे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यात संदीप सुधार तोटे हा जागीच ठार झाला. या घटनेनंतर ठार झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला. हत्या करण्यात आलेला युवक हा देखील एका हत्या कांडातील प्रकरणाचा आरोपी असल्याची माहिती समोर आलीय. सुभाष दुधे यांची 2018 साली यवतमाळमध्येच हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांड प्रकरणात संदीप हा आरोपी होती.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि FD वर सरकार देणार जास्त व्याज, जाणून घ्या काय आहे दर

सुभाष दुधे यांनी 2018 साली दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली. सुभाष दुधे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संदीपाचाही खून करण्यात आला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय. सुभाष दुधे हे दारव्हा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. 2018 साली त्यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे 2018 या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळातच दुधे यांचा खून करण्यात आला होता.

आता चार वर्षांनंतर संदीप तोटे याचीही नवरात्रोत्सवाच्या काळातच हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा 2018 सालच्या हत्येची संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, संदीपची हत्या करुन मारेकऱ्यांनी पळ काढला. सध्या पोलिसांकडून फरार मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. पुढली तपास यवतमाळमधील दारव्हा येथील पोलीस करत आहेत. या घटनेनं यवतमाळ हादरुन गेलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *