१८ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आधी दिले सिगारेटचे चटके मग फाडले कपडे

पुण्यात गेल्या काही दिवसानपासून विनयभंगाचे अनेक प्रकार समोर आले असून आता देखील, सिगारेटचे चटके देऊन कपडे फाडत तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार समोर आला असून, १८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्याचा ड्रम घ्यायचा असल्याचं सांगून तरुण आपल्या घरात शिरला. सिगारेटचा चटका देत कपडे फाडून आपला विनयभंग करण्यात आला, असा आरोप पीडितेने केला आहे.

ही घटना पाच एप्रिल रोजी घडल्याची माहिती आहे. तरुणी घरात एकटी असताना अनोळखी तरुण दरवाजात आला. पाण्याचा ड्रम घ्यायचा आहे, असं सांगून घरात घुसला, असा दावा पीडितेने केला आहे. आरोपीने आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराला बोलवले. त्याने तिला सिगारेटचा चटका देत तिचे कपडे फाडले आणि तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *