मनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

अमृता फडणवीस यांचे हिंदीमध्ये नवीन गाणे प्रदर्शित

Share Now

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ असे या गाण्याचे नाव आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला अडथळा नाही – देवेंद्र फडणवीस

अमृता फडणवीस यांचे ‘वो तेरे प्यार का गम’ हे नवं गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या गाण्याला 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘माय लव्ह’ या हिंदी सिनेमातील ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं आहे. आता या गाण्याचे रिक्रिएट वर्जन अमृता फडणवीस यांनी गायले आहे. ‘सारेगम’ या युट्यूब चॅनलवर ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं लॉंच करण्यात आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस स्वत: हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता फडणवीस यांच्या गाण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

मशरूमच्या या 5 जाती भारतात सर्वाधिक प्रसिद्ध आहेत, जाणून घ्या त्यांची खासियत

‘जब दिल टूटता है तो आवाज होती है’ असं म्हणत अमृता फडणवीसने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ‘माय लव्ह’ सिनेमातील ‘जब दिल टूटता है तो आवाज होती है’ हे गाणं आनंद बक्षी यांनी गायलं होतं. तर मुकेश यांनी गायलं होतं. पण आता या गाण्याचं रिक्रिएट वर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *