‘त्या’ प्रसिद्ध दुकानाला लावला मनपाने मोठा दंड
औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध राज क्लॉथ सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने लस घेतली नाही म्हणून प्रशासनाने कारवाई करीत ऐन संक्रांतीच्या एक दिवस अगोदर दूकान सील केले होते. त्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी पसरली होती. नियमभंग झाल्यास प्रशासनाने दंड लावावा पण दुकाने सील करू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
आधीच कोरोनामुळे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. त्यात संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दुकान बंद करणे म्हणजे पोटावर पाय असल्याचे त्यांचे म्हणणे होते. राज क्लॉथचे मालक अनिल केलानी यांनी प्रशासनाची माफी मागितली तरीही कुलूप उघडले नाही. काल मंगळवारी कामगार उपायुक्त राऊत यांनी सुनावणी घेतली. दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने दुकानाला 1 लाख रुपये दंड भरावा लागला. त्यानंतर दुकानाचे कुलूप काढण्यात आले. तसेच व्यापारी संघटनेचा आरोप आहे कि मोठ्या व्यापाऱ्यांना प्रशासन धारेवर धरत आहे आणि हातगाडी तसेच फेरीवाल्यांना सूट देत आहे.