भाजपा सोबतच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज्यपालांच्या वक्तव्यावर फिरली पाठ
गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही, मग महाराष्ट्रात काय उरणार? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोश्यारींना कोल्हापुरी चप्पल दाखवा, असे विधान करण्याची मजल हितेचं कशी असे उद्धव ठाकरेंनी म्हंटले, तसेच राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला महाराष्ट्राची काहीच माहिती नाही, तेव्हा कोश्यारीने फारशी हुशारी दाखवू नये. राज्यपालांच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही तेसच केले आहे.
गाय आणि म्हशी देखील होऊ शकतात सरोगेट मदर, जनावरांच्या मालकांना याचा होणार फायदा
राज्यपालांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही आणि मराठी माणसाच्या मेहनतीच्या जोरावर मुंबई आर्थिक राजधानी बनली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शनिवारी (३० जुलै) पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यपालांचे विधान वैयक्तिक आहे. हे आम्हाला मान्य नाही. मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. 106 लोकांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात सामील झाली. यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबईला ओळख मिळाली ती मराठी माणसांमुळे. असे ते म्हणाले.
तुमच्या गाडीत पेट्रोल कमी? मग वाहतूक पोलीस देतील २५० रुपयाची पावती?, वाचा काय आहे नियम
सीएम शिंदे म्हणाले, ‘राज्यपालांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपाल हे मोठे पद आहे. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे विधान करण्यापूर्वी कोणाचाही अपमान होणार नाही, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे.