राजकारण

अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याला अपयश; “या” व्यक्तीसोबत झाली नाही भेट !

Share Now

अजित पवार दिल्लीहून मुंबईला परतले, अमित शाह यांच्याशी भेट न होण्याचं कारण काय?
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दोन दिवस दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेसाठी थांबले होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक होण्याची अपेक्षा होती, पण दोन दिवस तळ ठोकूनही त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर अजित पवार मुंबईला परतले आहेत.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये भुकंप; नागरिक भयभीत

दिल्लीमध्ये असताना अजित पवार यांनी अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. अधिक मंत्रिपदं आणि अपेक्षित खाती आपल्या पद्धतीने मिळवण्यासाठी त्यांनी शाह यांच्याशी चर्चा करण्याची योजना केली होती. पण अमित शाह यांच्याशी बैठक न होऊन अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.

आज महायुतीच्या तीन पक्षांचे नेते राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शपथविधीच्या तयारीला अंतिम रूप दिलं जात आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *