राजकारण

अजित पवारांनी महाराष्ट्र विधान परिषदेतील विजयानंतर अमित शहां सोबत घेतली भेट.

Share Now

महाराष्ट्र विधान परिषदेतील विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अचानक दिल्लीत पोहोचले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचा कोणताही औपचारिक तपशील समोर आलेला नसला तरी, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, आगामी मंत्रिमंडळ विस्तारासोबतच विधान परिषदेच्या निवडणुकांबाबतही त्यांच्यात चर्चा झाली आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागा जिंकून शरद पवारांना धक्का दिला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. पहिल्या फेरीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले.

तुझे ओठ काळे आहेत,असे म्हणत पती करायचा पत्नी वर अत्याचार, महिलेची आत्महत्या

विधानसभा निवडणुकीवरही चर्चा
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाली मात्र त्याची माहिती समोर येऊ शकली नाही. ही भेट घेऊन अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले.

फोटो काढण्यासाठी मित्रांनी दिला तरुणाच्या हातात साप, चावल्याने त्याचा मृत्यू

यावेळी काकांना धक्का बसला
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला; त्यामुळे राष्ट्रवादीत पुतण्यापेक्षा काकाच सरस असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत भजितांनी काकांना धक्का दिला आहे. अजित पवार यांनी पक्षात फूट पडू दिली नाही. त्यामुळेच अजित पवार यांच्या पक्षाचा विजय झाल्याचे मानले जात आहे.

Mystery of Shri Jagannath Temple Mahaprasad

आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर साहजिकच महायुतीला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत काँग्रेसची सात मते विभागली गेली, तर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊ शकले नाही.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *