हत्येनंतर आरोपीने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकला ; आरोपीला अटक
पुण्यात एका १६ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादाक घटना पुण्यातील कोथरुडमध्ये गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. या अत्याचार आणि हत्येप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा तरुण आणि पीडित मुलगा हे दोघेही शेजारी आहेत. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. आरोपीविरोधात आयपीसी ३०२, २०१, ३६४ आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.
Maharashtra | A 16-year-old speech impaired boy was sexually abused and murdered allegedly by a 21-year-old man in Kothrud area of Pune city last night. His body was found in a gunny bag. Accused arrested and booked under sections of IPC and POCSO Act.
— ANI (@ANI) March 25, 2022