वकील गुणरत्न सदावर्ते अयोध्या दौरा करणार
येत्या ५ जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहे. त्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. १० जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अॅड. गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पायाखालची वाळू घसरली. अयोध्येत आमचं साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असं पायदळी तुडवू शकत नाहीत. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत.”
सरकारी नौकरी 2022: भारतीय कृषी संशोधन संस्थेत सहाय्यक पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज