क्राईम बिट

अदानीवर गंभीर आरोप; शेअर बाजारात खळबळ, शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले

Share Now

Adani Group | Gautam Adani | गौतम अदानीवर गंभीर आरोप ; गौतम अदानी आणि सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप
भारतीय शेअर बाजारात आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाने आणि सेक्र्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अदानी उद्योग समूहातील अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर, अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

पीएम किसान योजनेत तुमचं नाव नाही का? दोन हजार रुपये मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम!

अदानी उद्योग समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 10 ते 20 टक्क्यांनी घसरले असून, यामध्ये “अदानी एनर्जी सोल्यूशन्स” 20% घसरून 697.70 रुपये, “अदानी विल्मर” 10% घसरून 301 रुपये, आणि “अदानी ग्रीन एनर्जी” 18.93% घसरून 883.50 रुपये झाले आहेत. याशिवाय, “अदानी पोर्ट्स’, “अदानी एन्टरप्राईझेस”, “अदानी पॉवर”, आणि “अदानी टोटल गॅस” यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण झाली आहे.

गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्स लाच देण्याची ऑफर दिली होती. या प्रकल्पातून 20 वर्षांमध्ये साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळवण्याची अपेक्षा होती. तसेच, या भ्रष्टाचाराची माहिती लपवण्यासाठी अदानी समूहाने 3 अब्ज डॉलर्स किमतीचे बॉंड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप केला आहे.

सकाळच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स भविष्यात आणखी घसरू शकतात, जो शेअर बाजारात मोठा धक्का ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *