अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात ; शरद पवार याच्या विरोधात पोस्ट भोवणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले . राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.

नेमकं प्रकरण काय आहे ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला केतकी चितळेंचा परखड शब्दात समाचार

अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट शेअर केली असावी. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या . राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर ठिकाणी केतकी विरोधात तक्रारी दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *