महाराष्ट्रराजकारण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आवश्यक वाटल्यास आजच कारवाई ; पोलीस महासंचालक रजनीश सेठ

Share Now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त तपास करुन आवश्यक कारवाई आज करतील. कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या आज बैठकी पार पडली, यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रजनीश सेठ बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :- काँग्रेस नेते राहुल गांधीचा “पब” मधील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या भाषणाचा पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील, असं रजनीश सेठ यांनी सांगितले आहे.

कोणीही कायदा हातात घेऊ नका .कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालकांनी केलं. ते पुढे म्हणाले की,”कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या ८७ कंपनी आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत.”

हेही वाचा :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना अटक होणार ? कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले

राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.

हे ही वाचा (Read This) Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *