गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांचा अपघात ; तिघेजण गंभीर जखमी

सांगली :- आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला अपघात झाला. मतदार संघातील एका नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झालं आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर पिकअप गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले आहे. ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह ड्रायव्हर आणि अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *