TET परीक्षा घोटाळा जवळपास ७८०० विद्यार्थी पास केल्याचा खुलासा
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यापासून या परीक्षेत चौकशी दरम्यान दररोज नवीन खुलासा होत आहे. या परीक्षेत अपात्र असलेले जवळपास ७८०० विद्यार्थीं पैसे घेऊन पास केल्याचं समोर आला आहे.
पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९ – २०२० मध्ये घेतलेल्या TET परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आले आहे.
२०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले याची देखील पडताळणी सुरु आहे . या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९ -२०२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले.
यामुळे १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले होते. राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.