आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा होणार….पण ! .
आरोग्य विभागातील भरती पराक्षांचा घोटाळा बाहेर आला आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली. दोषींना शिक्षा होईलही पण पुन्हा परिक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान यावर आरोग्य विभाग कसा तोडगा काढणार हा खरा प्रश्न आहे. यावर आज खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले
कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे.
जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही.
गट क आणि गट ड च्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणाची संपूर्ण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं असून पुढे पोलिसांच्या पूर्ण तपास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार का..? हा प्रश्न उभा राहीला आहे.