सासरच्या मंडळीं विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून शिवीगाळ
सासरच्या लोकांकडून गेल्या तीन वर्षांपासून होणाऱ्या छळाला कंटाळून एक महिलाबारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्या महिलेला दुय्यम वागणूक मिळून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील माहेरी आलेल्या पीडितेवर सासरच्या छळाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पीडितेची दखल न घेता तिच्या वडिलांना पोलिसांकडून शिवीगाळ देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नवीन पक्ष चिन्हावरून संकट, शीख समुदायाने म्हणले तलवार आमचे धार्मिक चिन्ह
यामुळे माळेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत व पोलिसांकडून मिळालेल्या दुय्यम वागणुकी बाबत लोकमतशी बोलताना पीडितेने माहिती दिली. माळेगाव पोलिस किरकोळ तक्रारीबाबत देखील नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे देखील अनेक प्रकार समोर आले आहेत.
फिर्यादी महिलेची मावस नणंद ही पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. ती पीडितेच्या कुटुंबीयांचे कान भरवत वारंवार धमकी देत होती. तू कुठे ही गेलीस तरी कोणी काहीही करू शकत नाही. तसेच माळेगाव पोलिस ठाण्यातील ओळखीच्या पोलिसांना फोन करून पीडितेच्या दिराचे व जावेचे नाव फिर्यादीतून काढून प्रकरण जागेवरच दाबण्यासाठी पोलिसांना फोन येत असल्याचे महिलेने सांगितले.
या रब्बीत करा काळ्या गव्हाची लागवड, बाजारात 6000 रुपये क्विंटलने विकला जातो,जाणून घ्या संबंधित मुख्य गोष्टी
सासरच्या लोकांकडून टेम्पो खरेदी करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. मात्र,माहेरची परिस्थिती बेताची असल्याने ती दहा लाख रूपये आणू शकली नाही. यामुळे विवाहितेला घराच्या बाहेर काढून तिला सातत्याने मारहाण करून उपाशी ठेवले जात होते. तसेच तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन तिला मारहाण केली जात होती. मानसिक,शारीरिक त्रास देत छळवणूक करून घराच्या बाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार घडून देखील पोलीस प्रशासन गांभीर्य घेत नव्हते.
उलट महिलेच्या वडिलांना पोलिसांनी शिवीगाळ केली असल्याची माहिती वडिलांनी दिली. मात्र,पोलीस ठाण्यात गोंधळ घालून कपडे काढून उपोषण करण्याचा इशारा देताच पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शरद विलास काळे (पती), विलास आत्माराम काळे (सासरे),रंजना विलास काळे (सासु),अमित विलास काळे (दिर), शितल अमित काळे ( जाव) सर्व रा.हिंगणी (ता.खटाव,जि. सातारा) यांच्या विरोधात माळेगाव पोलिसांत चारित्र्यावर संशय, जाचहाट छळ करून उपाशीपोटी ठेवुन वारंवार शिवीगाळ दमदाटी केल्या बाबत गुन्हा नोंद केला आहे.
”या प्रकरणाची चौकशी करून याबाबत नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाईल असे गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती) यांनी सांगितले आहे.”
”हे सर्व खोटे आहे. मुलीचे वडील दारुडे आहेत. त्याने पोलीस ठाण्यात खूप गोंधळ घातला, मुलीची फिर्याद देण्याची इच्छा नव्हती. परंतु मुलीचे वडील फिर्याद घ्या नाहीतर डोक्यावर घेईल असे मोठ-मोठ्याने ओरडत होता. – किरण अवचर (पोलीस निरीक्षक,माळेगाव पोलीस ठाणे)”