भररस्त्यात महिलेवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू
बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालय स्थित लोहियानगर सहायक पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री अज्ञातांनी एका महिलेची गोळी घालून हत्या केली. तनिष्कच्या शोरूममध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचं नाव नेहा देवी आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, यानंतर पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती आपल्या माहेरी राहत होती. येथील तनिष्कच्या ज्वेलरी शोरूममध्ये ती काम करीत होती.
पुणे ग्रामीण भागात ११ तरुण बिष्णोई गॅंगचे सदस्य, संतोष जाधवने दिली धक्कादायक माहिती
शनिवारी रात्री तनिष्कच्या शोरूममध्ये ड्यूटी संपल्यानंतर ती स्कूटीने घरी परतत होती. यादरम्यान पनहास चौकात आधीच तयारीत असलेल्या गुन्हेगारांनी तिच्यावर फायरिंग केली. गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक घटनास्थळाच्या दिशेने धावले आणि नेहाला शहरातील खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषितकेलं.
मिरचीचे सुधारित वाण: मिरचीच्या या शीर्ष ५ जाती अधिक उत्पादन देतील
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवलं. नेहावर कुटुंबाची जबाबदारी होती. आता तिच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यात लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचं म्हणणं आहे की, शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. बेगूसरायमध्ये पोलिसांकडून कडक कारवाई न केल्यामुळे आरोपी अधिक तीव्र झाले आहेत. दुसरीकडे घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.