माजी मंत्र्यांच्या घरात शिरला चोर ; बंदुकीचा धाक दाखवत केली ५० हजारांची मागणी
राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांच्या नांदेड येथील शिवाजीनगर घरात सोमवारी ३० मे रोजी तरुण घुसला. त्याने किचनमध्ये असलेल्या नोकराला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची मागणी केली, सावंत यांच्यावरही त्याने बंदूक रोखली होती. ती बंदूक बनावट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले त्यानंतर पळून जात असताना त्या युवकाला पकडण्यात आले आहे .
राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीची लढत..
साहिल माने वय (३५) असे तरुणाचे नाव आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात माजी मंत्री डी. पी. सावंत यांचे निवासस्थान आहे. याच परिसरात बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांचेही घर आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता साहेबांना भेटण्यासाठी म्हणून बीड जिल्ह्यातून माने नावाचा तरुण आला. परंतु अशोक चव्हाण यांची भेट न झाल्याने हा तरुण थेट डी. पी. सावंत यांच्याकडे गेला. शेतीविषयक वाद मिटवण्यासाठी मदत हवी आहे असे त्याने सांगितले. या वेळी ‘माझे कार्यक्षेत्र नसल्याने मी काही करू शकत नाही, तू पोलिसात तक्रार कर’ असे सांगून सावंत यांनी त्याला सल्ला दिला .
त्यानंतर परत तो दुपारी ३.४५ वाजता त्यांच्या घरी आला. या वेळी सावंत घरात नव्हते. ते आयटीएएमला गेल्याचे सांगितल्यानंतर तो तेथे जाऊन परत आला व चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत वाद घालायला पोहोचेपर्यंत सुरुवात केली. त्याच वेळी सावंत घरी आले. पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली व दरवाजा बंद केला.
केंद्र सरकारची मोठी घोषणा ; कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना ४ हजार रुपये महिना
तो विक्षिप्तपणे वागू लागल्याने सावंत यांनी त्याला समज देऊन बाहेर काढले. अर्धा तास तो बाहेर बसला. पाठीमागच्या दरवाजाने किचनमध्ये शिरला आणि सुभाष पवार यांच्याशी झटापट करून बनावट बंदूक लावली. किचनमधून आवाज येत असल्याने सावंत मध्ये गेले. त्याने त्याला सोडले आणि सावंत यांच्याकडे बंदूक रोखली. यादरम्यान पवार यांच्या डोक्यावर त्याने बंदुकीचे मॅगझिन मारून जखमी केले. यानंतर त्याला हळुवार बोलत बाहेर काढले. बाहेर पडताच तो पळाला. दरम्यान, तो डॉ. व्यंकटेश काब्दे रुग्णालयापर्यंत युवक काँग्रेसचे सत्यपाल सावंत यांनी पकडले व शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले .
ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !