कंटेनरची दहा प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला धडक ; ६ जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मुंबई-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंटेरनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात झाला तर ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आली आहे.
या दुर्घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला कट मारून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. कंटेनर क्रमांक PB-05-AB-4006 तर वाहतूक करणारी रिक्षा क्रमांक MH-17-AJ 9056 या वाहनांची धडक एवढी भीषण होती कि यात रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तसेच रिक्षातील प्रवाश्यासह ७ जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :- राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन’ ..! काय आहे या नावाचा अर्थ ?
यात राजाबाई साहेबराव खरात (वय 60 वर्ष, रा. चांदेकसारे), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65 वर्ष, रा. वावी), शैला शिवाजी खरात (वय 42 वर्ष, रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (वय 52 रा. श्रीरामपूर), पूजा नानासाहेब गायकवाड (वय 20 वर्ष, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय 20 वर्ष, रा. चांदेकसारे) सहा जणांचा मृत्यू झाला झाला असून जखमींमध्ये विलास साहेबराव खरात, कावेरी विलास खरात, रुपाली सागर राठोड, धृव सागर राठोड तसेच मोटार सायकल वरील. दिगंबर चौधरी यांच्यासह त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी आणि बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर या अपघातात मृत्यू झालेल्याचे मृतदेह पोलिसांनी शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पाठवले आहेत. सर्व जखमींवर एस. जे. एस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेत कंटेनर चालक दर्शनसिंग वय 42 वर्ष, रा. दानामंडी लुधियाना पंजाब येथील आहे . हा नाशिकच्या दिशेने पळाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला झगडे फाटा येथे पकडले आहे. या अपघाताच पुढील तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या