“चोरांची जोडी” महायुती सरकारने केलेल्या घोटाळ्यांवर मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
सांगली : मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपावर घणाघाती टीका, ‘भाजपा विषारी सापासारखा आहे’
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. सांगलीत काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेनिमित्त आयोजित सभेत खरगे यांनी भाजपावर तीव्र टीका केली. “भाजपा हा विषारी सापासारखा आहे”, असे सांगून खरगे यांनी भाजपाला ‘खतरनाक’ म्हणून संबोधले. “राजकारणात सगळ्यात खतरनाक भाजप आणि आरएसएस आहेत. एखाद्या विषारी सापाप्रमाणे भाजप आहे. त्याला मारून टाका,” असे आवाहन त्यांनी सभेत केले.
जळगाव शहरात घडली धक्कादायक घटना; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
खरगे यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रात चोराचे सरकार आहे. हे सरकार चोरांनी मिळून बनवले आहे.” त्यानंतर त्यांनी भाजपाचे नेते आणि त्यांच्या वागणुकीवर आरोप करत “भाजपाचे लोक खतरनाक आहेत,तुम्हाला कधी काय होईल हे सांगता येत नाही कारण त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे,” असे टीकास्त्र सोडले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरील आरोपांचा दाखला देत महाराष्ट्रातील भाजप सरकारवर देखील हल्ला केला. “नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. त्याहून मोठा घोटाळा महाराष्ट्रातील सरकारमध्ये आहे,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर आरोपांची झोड उठवली. “घोटाळे झालेत कारण 50 खोके दिलेत, पैसे कोठून आले? पैसे देऊन हे सरकार चालवले जात आहे, त्यामुळे हे पैसे कुठून आले असतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\
Exclusive: Ground Report & Analysis मध्य -छत्रपती संभाजीनगर!
खरगे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, “भाजपाने जनतेच्या पैशावर आपल्या पक्षाचा प्रचार केला आहे. जर ते ‘पुन्हा येणारे’ सरकार असं सांगत आहेत, तर त्यांना जनतेच्या खिशातून पैसे मिळवून सरकार चालवता येईल का?” हे भाषण करत असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विरोधात असलेल्या मते आणि आरोपांची एक झंकार केली. काँग्रेसच्या रणनीतीनुसार त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला कडवट विरोध करण्याची तयारी दर्शवली. खरगे यांच्या या भाषणाने राज्याच्या राजकीय वर्तम्यान एक वेगळीच खळबळ उडवली आहे.
Latest:
- शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी या 6 सुधारित वाणांचा वापर करावा, पुसा येथून बियाणे मागवण्यासाठी याप्रमाणे नोंदणी करा
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत