चक्क बकरीवर केला नराधमाने बलात्कार, नंतर केली तिची हत्या
केरळ राज्यातील कासरगोड पोलीस ठाण्यातील एका नराधमाला पोलिसाने अटक केली आहे, चार महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट बकरीवर बलात्कार करून या नराधमाने त्या भाकरीची हत्या केलेली होती. हा आरोपी तामिळनाडूमधील सेंथिल इथला असून, हाॅटेलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. हाॅटेलच्या मालकाने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली होती.
हाॅटेल मालकाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजता बकरीच्या ओरडण्याचा आवाज येत होता, त्यानंतर सर्व कामगार उठले. समोरचा प्रकार पाहिला तर तिथे प्रेग्नेंट बकरी पडलेली होती आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्या ठिकाणातून एक व्यक्ती पळून जाताना कामगारांनी पाहिले. नंतर तो हाच नराधम आहे असे पोलिसांना कळले, . हाॅटेलमध्ये मागील २ वर्षांपासून तो काम करत होता.
पोलिसांना संबंधित आरोपीवर हे अनैसर्गिक कृत्य केल्या मुले गुन्हा दाखल केलेला आहे. हाॅटेल मालकाने आणखी दोन व्यक्ती या प्रकरणात सामील असल्याचे सांगितले आहे. परंतु, पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात फक्त सेंथिलच गुन्हेगार आहे. होसदूर्ग स्टेशन हाऊस ऑफिसरचे म्हणतात की, “अनैसर्गिक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांचे सरकारी डाॅक्टरांनी बकरीचे पोस्टमार्टेम केलेले आहे, त्यावरून बकरीवर अनैसर्गिक सेक्स केल्याचे निष्पन्न झालेले आहे.