तलावात पलटला दारूचा ट्रक, बॉक्स लुटण्यासाठी तरुणांनी घेतल्या उड्या

कोल्हापूर : तुळजापूर जवळील पाचुंदा तलावाजवळ एक ट्रक पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्या कारणाने उलटला. तो ट्रक कर्नाटकातील हुमानाबाद येथील एका विदेशी मद्य कंपनीतून दारू कोल्हापूर येथे पोहोचवायला जात असताना हा अपघात झाला. दारूचे ट्रक पलटी झाले हे समजतात जवळील गावातील तरुण तेथे गोळा झाले आणि दारू साठी त्यांनी चक्क १५ फुट खोल पाण्यात उलटलेल्या ट्रक मधून दारूचे बॉक्स काढून तेथून निघून गेले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच चालक महादेव हिंगमिरे व क्लिनर रमेश खडपिटे ( दोघे राहणार नांदेड ) तुळजापूर-लातूर महामार्गाजवळील पाचुंदा तलाव येथे चालक महादेव हिंगमिरेचा गाडीवरील नियंत्रण सुटल्या कारणाने हा अपघात घडला अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच मद्य किती किमतीचे होते या संदर्भातील पावत्या देखील ट्रक मध्ये होत्या, घटनेची सविस्तर माहिती घेऊन घटनेची नोंद केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *