क्राईम बिटमहाराष्ट्र

मोदींच्या दौऱ्या आधी पुण्यात मोठ्या प्रमाणात सापडले काडतुस, काय होता कट

Share Now

पुण्यातून एक मोठी बातमी समोर अली आहे. पुणे पोलिसांनी एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पुणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहू दौऱ्यावर येणार आहेत, त्या आधी पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशन दरम्यान गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली आणि एकाच खळबळ उडाली. या धाडीत पुणे पोलिसांना जिवंत काडतुसे तसेच काडतुसाचे लीड सापडले आहेत.

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला अटक

या प्रकरणी भंगार व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतलं असून. दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत.

मिरचीचे सुधारित वाण: मिरचीच्या या शीर्ष ५ जाती अधिक उत्पादन देतील

जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत 1 लाख 65 हजार 900 रुपये आहे. आरोपीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणली कुठून? काडतुसे आणली कशासाठी? काडतुसे जवळ का बाळगल्या? यापूर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे किंवा अग्नी शस्त्रे दिली आहेत काय? याबाबत पुणे पोलीस दिनेशकुमार कल्लूसिंग सरोजकडे कसून चौकशी करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *