८६ व्या वर्षी बापाने केला लग्नाचा हट्ट, पोराने बापाला संपवलं.
लग्नाचा हट्ट करत बापाने, वयाच्या 86 व्या वर्षी वधू – वर सूचक मेळाव्यात नाव नोंदवलं होत, याचा राग आल्याने मुलाने बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. बापाने दुसरं लग्न केल्यास समाजात अपमान होईल आणि मालमत्तेत वाटेकरी होईल यामुळे मुलाने बापाची हत्या केली.
पुण्यातील राजगुरूनगर भागात ही घटना घडली आहे. वयाच्या 86 व्या वर्षी बापाने दुसरं लग्न केल्यास समाजात अपमानास्पद वागणूक मिळेल तसेच मालमत्तेत वाटेकरी होईल, याचा राग वडिलांच्या जीवावर उठला. वडिलांच्या गळ्यावर सुरीने वार केले. सुरीला धार नसल्याने गळा चिरला जात नव्हता, मात्र मुलाने दगडी वरवंटा डोक्यावर मारून बापाला शेवटी संपवून टाकलं. अशी माहिती खेड पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
मुलाने बापाचा खून करून खेड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची माहिती दिली, मुलगाच फिर्यादी झाला आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय ८६ वर्ष) असं मयत वडिलांचं नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे (वय ४७ वर्ष, रा. राजगुरुनगर) असं आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.