पोलीस भरतीची खोटी अधिसूचना जारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तरुणांना पोलीस होण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र मुंबई पोलिसानी पोलीस भरतीची खोटी अधिसूचना जारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : अंड्याच्या मध्यभागी असलेला पिवळा भाग खाणे योग्य आहे की नाही ? जाणून घ्या..
महाराष्ट्र पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बनावट अधिसूचनेद्वारे सरकार आणि पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
बनावट अधिसूचनेवर गृह विभागाच्या सचिवांचे नाव होते. यानंतर गृहविभागाच्या सचिवांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आयपीसीच्या कलम ४१९, ४२०, ४६५, ५११ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.