धनंजय महाडिक यांच्यावर बाबत लाडक्या बहीणीं बाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे गुन्हा दाखल
कोल्हापूरातील महायुतीच्या प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या एका विधानाने मोठा वाद निर्माण केला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्या महिलांची फोटो काढण्याची सूचना दिली होती. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली असून, महाडिक यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
देव उथनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी करा अर्पण, भगवान विष्णूचा मिळेल आशीर्वाद!
लाडक्या बहीणीं बाबतचं वादग्रस्त विधान
महाडिक यांच्या या विधानामुळे एक मोठा वाद उभा राहिला आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, “जर काँग्रेसच्या रॅलीत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांना दिसल्यास, त्यांचे फोटो काढा, त्यांची नावं लिहा आणि याचे प्रमाण ठेवा. असं होऊ देत नाही की, आपले पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेत सहभागी होणं.” महाडिक यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोवर या महिलांना पैसे दिले जात आहेत, तोपर्यंत त्यांना काँग्रेसच्या रॅलीत सहभागी होऊ देणं योग्य नाही.
माघार घेण्यावरून संभ्रम कायम, सदा सरवणकर नेमकं काय म्हणालें?
त्यांनी याबद्दल पुढे असेही सांगितले की, “जर कोणतीही महिला ‘पैसे नको’ असं म्हणत असेल तर, तिच्या नावावर लगेच साइन करावं आणि पुढच्या दिवशी पैसे बंद करावं. हे पब्लिक मनी आहे, त्याचा दुरुपयोग होणार नाही,” असं महाडिक म्हणाले.
महाडिक यांच्या या विधानावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आरोप केला आहे की, हे विधान आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने त्यांना आचारसंहिता उल्लंघन केल्याबद्दल नोटीस दिली होती, पण महाडिक यांनी त्यावर संतोषजनक उत्तर दिलं नाही. यामुळे, आयोगाच्या आदेशावरून धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडिक यांच्या या विधानामुळे त्यांची अडचण वाढली असून, त्यांच्या विरोधात अधिक तीव्र कारवाई होण्याची शक्यता आहे.
Latest:
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.
- शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी या 6 सुधारित वाणांचा वापर करावा, पुसा येथून बियाणे मागवण्यासाठी याप्रमाणे नोंदणी करा
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी