भाजप नेते विनोद तावडे विरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण
भाजप नेते विनोद तावडे विरोधात गुन्हा दाखल जाणून घ्या प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, विरारमधील मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर आरोप केला आहे की, ते पैसे वाटत होते. त्यानंतर, हॉटेलच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांची कॅश सापडली, ज्यामुळे प्रकरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तासभर गोंधळ सुरू राहिला.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला मतदानासाठी महत्त्वाचे आवाहन
या आरोपानंतर, भाजप नेते विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना पत्रकार परिषद घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी खुलासा केला की, त्यांना भाजपमधूनच याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे आरोप चांगलेच तीव्र झाले आहेत.