२९५ डबे जोडून ३.५ किमी लांबीची ट्रेन धावली, पाहा व्हिडिओ
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने स्वातंत्र्य दिनानिमित्त 295 डब्यांची मालगाडी चालवली. त्याचे वजन 27,000 टन होते. ट्रेनची लांबी 3.5 किमी होती. या मालगाडीने विक्रम केला. 15 ऑगस्ट रोजी आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत शासकीय अभियान राबविण्यात आले. ही सर्वात लांब आणि जड मालवाहतूक ट्रेन आहे. एवढी मोठी ट्रेन खेचण्यासाठी एकूण 6 इंजिन बसवण्यात आले होते. या गुड्स ट्रेन ट्रेनला सुपर वासुकी असे नाव देण्यात आले आहे.
ATM मधून पैसे काढणे महागणार, जाणून घ्या किती असेल बँकेचे चार्जेस
5 गाड्या जोडून तयार केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृत महोत्सवाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून रेल्वेने पाच लोडेड ट्रेन्स एकमेकांना जोडल्या. या ट्रेनने 267 किमी अंतर कापले. 15 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमधील कोरबा येथून नागपुरातील राजनांदगाव येथे कोळसा नेण्यात आला. ही ट्रेन 13.50 ला निघाली. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 11 तास 20 मिनिटे लागली. रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ही ट्रेन भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्तीसगडमधील कोठारी रोड स्टेशन ओलांडताना ट्रेनचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुपर वासुकीला हे स्टेशन पार करायला सुमारे चार मिनिटे लागली.
पाहा व्हिडिओ
Super Vasuki – India’s longest (3.5km) loaded train run with 6 Locos & 295 wagons and of 25,962 tonnes gross weight.#AmritMahotsav pic.twitter.com/3oeTAivToY
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 16, 2022
कृषी क्षेत्राचा विक्रम: यावर्षी विक्रमी 316 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले
वीज संकटात मोठी कामे होऊ शकतात
मालवाहतूक ट्रेन सहसा कोळशाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. त्यात १९ वॅगन्सचा समावेश आहे. प्रत्येक वॅगनमध्ये सुमारे 100 टन कोळसा भरला जातो. गेल्या वर्षभरात किमान दोनदा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक वीज केंद्रांवर वीज संकट कोसळले आहे. पण, सुपर वासुकीसारख्या गाड्या धावल्यानंतर अशा संकटावर मात करणे सोपे जाऊ शकते.