10 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच फक्त 299 रुपयांमध्ये मिळणार, पोस्ट ऑफिस योजनेबद्दल जाणून घ्या..
आजच्या काळात आरोग्य विम्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार वाढतच जातो. महाग विमा घेतला तर त्यांचा हप्ता महाग असतो. यामुळेच बहुतेक लोक विमा घेण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन इंडिया पोस्टने एक समूह विमा संरक्षण योजना हाती घेतली आहे. यासह तुम्हाला 299 ते 399 रुपयांच्या प्रीमियमवर 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
पोलिसानेच केले ३ पोलिसांवर गोळीबार, 2 ठार, 1 जखमी
इंडिया पोस्ट आणि टाटा एआयजी यांनी एक करार केला आहे ज्या अंतर्गत 18 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील लोक सामूहिक अपघाताच्या बाबतीत विमा घेऊ शकतात. विमा संरक्षण अंतर्गत, अपघातामुळे मृत्यू, कायमस्वरूपी किंवा आंशिक अपंगत्व, अर्धांगवायू 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल. या विम्याचे 1 वर्षानंतर नूतनीकरण करावे लागेल. यासाठी त्या व्यक्तीचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
लसणाचे भाव कोसळे शेतकऱ्यांना मिळतोय ५ ते ७ रुपये किलोचा दर, असे उत्पन्न दुप्पट होणार का?
रुग्णालयाचा खर्च
विम्यामध्ये व्यक्तीला कोणत्याही अपघातामुळे रुग्णालयात दाखल केल्यास उपचारासाठी 60,000 रुपये आणि आयपीडी आणि ओपीडीमध्ये 30,000 रुपये दिले जातात. याशिवाय 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाखांपर्यंतचा खर्च, 10 दिवस हॉस्पिटलमध्ये दररोज 1000 रुपये दिले जाणार आहेत. मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये दिले जातील.