देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार, जे पी नड्डानी दिली माहिती
महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार बुधवार, २९ जून रोजी सरकार कोसळल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला होता. त्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच कालावधीनंतर मिळतोय बंपर भाव
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा- शिवसेना अशी युती होती. निवडणुकीत भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने ५६ जागा अशा १६१ जागा जिंकल्या होत्या. अपक्ष मिळून १७० आमदार होते. त्यानंतर भाजपा- शिवसेना सरकार येईल अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की भाजपाचा मुख्यमंत्री बनेल. मात्र, देवेंद्र फणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे सांगितले. आणि ते म्हणाले होते कि मी या मंत्रिमंडळात नसणार असे फडणवीस म्हणाले.
प्रत्येक सरकारी बँक होणार खाजगी, जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना
दरम्यान, यावर जे पी नड्डा यांनी आता घोषणा कि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील. ते म्हणाले ” महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी मोठे मन दाखवत भाजपने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. श्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेली ओढ दिसून येते, कोणतेही पद मिळवणे हे आमचे ध्येय नसून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे हे भाजपने हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.” असे नड्डा म्हणाले.
तसेच ट्विट करत अमित शहा यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले ” भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सांगण्यावरून. देवेंद्र फडणवीस मोठे मन दाखवून जींनी महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”