महाराष्ट्रराजकारण

११ तारखेला होणारी न्यायालयाची सुनावणी आजच ५ वाजता, १६ आमदार निलंबनाच निकाल राखीव मग फ्लोअर टेस्ट का? शिवसेनेचा सवाल

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय अस्थिरते मुळे आणि सत्ताधारी आमदारांनी बंडखोरी केल्या मुळे राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे, दरम्यान राज्यपाल भगतसिह कोषारी यांनी विधानसभा सचिवांना पात्र लिहले आहे. त्यात येत्या २४ तासात शिरगणती करून लवकरात लवकर ‘फ्लॉवर टेस्ट’ घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करा असे आदेश दिले आहे. त्यावर आता उद्या सगळे बंडखोर आमदार मुंबईत असेल.

या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे, सर्वोच्य न्यायलायत शिवसेनेनं देव घेतली आहे. न्यायालयाने दिलेल्या ११ तारखे पर्यंतची मुदत वाढ आमदारांना आपली 5 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश दिले आहे, तसेच 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र करता येणार नाही, नोटीस बजावलेल्या आमदारांना 12 जुलैला संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात अली आहे. असे आदेश न्यायायलाने दिले.

यावर शिवसेनेकडून या संपूर्ण प्रकरणी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली आहे आणि या मुद्द्यावरून आता न्यायालयात यावर सुनावणी आहे, वकील अभिषेक मनू शिंगवी यांनी या प्रकरणावर शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका केली. तातडीने फ्लॉवर टेस्ट घेणे बेकायदेशीर आहे, जर ते सोळा आमदार बहुमत चाचणीत सहभागी झाले तर आमच्या म्हणण्याला काही अर्थ राहणार नाही. ११ तारखेला लागणार निकाल आजच लावा, असे अभिषेक मनू शिंगवी यांनी न्यायालयत कळकळीची विनंती केली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी देखील ट्विट करून असे म्हंटले आहे कि, “16 आमदारांना अपात्र ठरवल्या प्रकरणी दिवसाला कमी वेळ देण्यात आला होता, त्यामुळे कोर्टाने आमदारांना 11 जुलैपर्यंत बाजू मांडण्यासाठी आणि राज्य विधानसभेचे अधिवेशन एका दिवसात बोलावले आहे. हा केवळ अन्यायच नाही तर भारतीय राज्यघटनेची थट्टाही आहे. ” असे ते म्हणाले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *