जनहिताची कामे अडकू नये म्हणून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘मोठा’ निर्णय
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी हो आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
संजय राऊत यांना ईडीची नोटीस, राजकीय गदारोळात चौकशीसाठी समन्स
मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे, यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्यान खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे
सोयाबीनची सुधारित लागवड : शेतकऱ्यांसाठी वरदान
एकनाथ शिंदे, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई हे मंत्री शिंदे गटात आहे, तसेच शिवसेनेकडे सुभाष देसाई, अनिल दत्तात्रय परब, शंकर यशवंतराव गडाख आणि आदित्य ठाकरे हे ठाकरे गटातील मंत्री आहे.