आता ती वेळ गेली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील – संजय राऊत
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही हार मानणारे नाही असे त्यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांवर ते म्हणाले की, आम्ही त्यांना परत येण्याची संधी दिली, पण आता वेळ निघून गेली आहे. असे ते म्हणले
बंडखोर आमदारांवर निशाणा
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 12 अपक्ष आणि लहान पक्षांव्यतिरिक्त 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी सरकार आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
मान्सून वेळेवर दाखल पण पाऊस ४१ टक्क्यांनी कमी, महाराष्ट्रात खरीप पिकांच्या पेरणीची अवस्था बिकट
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत
संजय राऊत म्हणाले की, आम्ही हार मानणार नाही. आम्ही जिंकत राहू. आमचा लढा रस्त्यावरही सुरूच राहणार आहे. आम्हाला जे करायचे होते ते आम्ही केले, आता रस्त्यावरची लढाई आम्ही जिंकू. आम्ही पूर्णपणे तयार आहोत. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. आता वेळ हातातून निसटल्याचे शिवसेना नेत्याने बंडखोर आमदारांना सांगितले. आम्ही त्यांना परत येण्याची संधी दिली. आम्ही सर्व तयारी केली आहे. तुम्हाला आवाहन आहे, एकत्र या, असे देखील राऊत म्हणाले.
बंडखोर आमदारांकडे माहिती नव्हती
महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएलसी निवडणुकीनंतर बंडखोर आमदार गुजरातकडे जात असताना त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक किंवा पीए नव्हता. अशा स्थितीत त्याच्या हालचालींची कोणालाच कल्पना नव्हती.
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार, म्हणाले…
आमदार संजय सिरसाट यांच्या पत्राला उत्तर
त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या पत्राला आणखी एका पत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेमुळेच तुमचा विजय झाल्याचे पत्रात लिहिले आहे. शिरसाट, ‘आता येणाऱ्या निवडणुकीत संभाजी नगर पश्चिममधून फक्त शिवसेनाच जिंकेल तीही तुमच्याशिवाय. असे पात्र शिंदेंचे सर्मथक आमदार संजय सिरसाट यांना दिले आहे.