साहेब, आमच्यासाठी ‘वर्षा’चे दार आजवर बंद होती! आमदार संजय शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
पत्रास कारण की.. असे म्हणत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पात्र लिहल आहे, या पत्रात आमदारांनी असे का केलं? या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नच उत्तर आहे असा म्हणणे वावगे ठरणार नाही. संजय शिरसाट यांनी या पात्रात अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारली आहे. त्यांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हेच आपले खरे विरोधक आहे असे म्हंटले आहे. शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी सरकारला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा आहे.
‘धनुष्यबानावर’ शिंदे गटाचा दावा ?
एककीकडे त्याच पक्षातील आमदार बंडखोरी करून ‘कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हेच आपले खरे विरोधक’ असे पात्र मुख्यमंत्र्यांना पाठवतात. मुख्यामंत्र्यांनी वर्षा बांगला सोडला या असायला धरून शिरसाट पुढे म्हणतात ” खऱ्या अर्थनाने काल वर्षा बंगल्याची दार सर्वसामान्यांसाठी खुली झाली” असेही ते म्हणाले. तसेच शिरसाट विधानपरिषद आणि राज्य सभा निवडणुकीत झालेल्या मटाफुटी आणि त्यात केलेल्या राजकारण मुळे शिरसाठ हे नाराज होते अशेही दिसते. मात्र बाळासाहेब हे आमचे देव आहे, आमचे विट्ठाल आहे असे देखील ते म्हणाले. मग नाराजी फक्त मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसवर आमदारांची नाराजी आहे हे या पात्रात लक्षात येते.
एखाद्या राज्याचे सरकार मध्येच कसे पडते? आज अल्पमत आणि अविश्वास प्रस्तावाचे अंकगणित समजून घेऊ
पुढे संजय शिरसाटानी एक त्यांचा अनुभव देखील पात्रात लिहिला आहे, जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्याला गेले, आमदार देखील त्याचा सोबत जात होते. त्यात संजय शिरसाट देखील होते, पात्रात संजय शिरसाट यांनी सांगितले कि, “मुख्यमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेबाना फोन करून आमदारांना अयोध्याला जाऊ देऊ नका, असे सांगितले, आणि आम्ही विमानतळावरून मागे फिरलो” तसेच त्यांनी हिंदुत्व, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे ना? असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मुख्यामंत्र्यांच्या कालच्या भावनिक आवाहना बद्दल शिरसाट पुढे म्हणतात ” काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होत, पण त्यांत आमच्या मूळ प्रश्नच उत्तर नव्हतं”
दरम्यान, भारताच्या इतिहासात सध्या शिवसेनेसाठी हे मोठं पर्व ठरेल का? केंद्रात देखी मंत्री पद देण्याची भाजपने ऑफर दिली आहे म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा ‘शिवसेनेचा’ नेता केंद्रात जाईल का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.