ठाकरे सरकार अल्पमतात, आता महाविकास आघाडी सरकार पडणार ?

आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कोणाची यावरुन वाद होण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या टि्वटनंतर त्यांनी पाठवलेल्या पत्रानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहले.

शिवसेनेने आमदारांना दिले ‘अल्टिमेटम’, संध्याकाळी बैठकीला या अन्यथा…

या पत्रात 34 आमदारांच्या सह्या आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत. यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर ठाकरे सरकारकडे नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

ठाकरे सरकार : आज राजीनामा देणार ?

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना नवं पत्र पाठवत सुनील प्रभू यांच्या नियुक्तील आव्हान दिलंय. सुनील प्रभू यांचा आदेश अवैध असून प्रतोदपदी भारत गोगावली यांची नियुक्ती केल्याचं शिंदे यांनी पत्रात जाहीर केले आहे. या पत्रात तब्बल 34 आमदारांच्या सह्या आहेत. सात पानांच्या या पत्रात 2019 च्या निवडणुकीत भाजप सोबत युती केली. परंतु सरकार विरोधकांसोबत बनवले. त्यासाठी वेळोवेळी तत्वांशी तडजोड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *