महाविकास सरकारचा आज श्वातच दिवस, शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना?
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले. आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.
शिवसेनेने आमदारांना दिले ‘अल्टिमेटम’, संध्याकाळी बैठकीला या अन्यथा…
एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे.सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला CIFS ची सुरक्षा असणार आहे.
आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गट नेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.