भगतसिग कोषारीनां कोरोनाची लागण, केंद्राची तत्परता गोव्याच्या राज्यपालांची नियुक्त
सध्या राज्याच्या राजकारणात मोठं भगदाड पडले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, महाविकास आघाडी आता शेवटच्या घटिका मोजाय आहेत. तब्बल ४० हुन अधिक आमदारानं घेऊन आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे लवकरच ३/४ आमदारानं माझ्या कडे आहे असे पात्र राज्यपालाना देतील, मात्र अश्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी याना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्या जागेवर गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांना दिली आहे. दरम्यान आज दुपार पर्यंत येऊन ते अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.
हेही वाचा :
महा शरद पोर्टल: mahasharad.in, ऑनलाइन नवीन नोंदणी, दिव्यांग पेन्शन
संजय बियाणी हत्या प्रकरणी वापरलेली दुचाकीच्या मालकाला अटक
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला पोहचले आहेत . एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहेत . विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. एकनाथ शिंदे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.