एकनाथ शिंदेंवर शिवसेने कडून बंडखोरी मुळे ‘ही’ कारवाई, दिलेली मोठी जबाबदारी घेतली काढून
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घाट आहे. सध्या शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे अशी राजकीय दंगल पाहायला मिळत आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांनी बंड केले म्हणून त्यांचं विधिमंडळ गटनेते पद काढून घेतले आहे. शिवसेनेने शिंदेंवर हि मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी याना नियुक्त करण्यात आले आहे. शिवसेनेचं विधिमंडळ पद हे एकनाथ शिंदे यांच्या कडे होते, मात्र बंद खोरीमुळे त्याच पद काढून घेतले आहे.
दरम्यन, आता राज्यातीत राजकीय वादंग जोर धरत आहे, काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला नको असे नाराज आमदारांनी आपली भूमिका मांडली आहे, अशी माहिती आला समोर येत आहे. अडीच वर्ष घरोबा केला आता आम्हाला हे सरकार नको. तसेच आम्ही शिवसेने सोबत आहोत मात्र आता आम्ही कॉग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा करणार नाही. अशी भूमिका नाराज आमदारांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
लसूण लागवड: लसूण लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे, पेरणीपासून फवारणीपर्यंत योग्य मार्ग जाणून घ्या
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला पोहचले आहेत . एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहेत . विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.