महाराष्ट्र

राज्याचा दहावीचा निकाल ९६. ९४ टक्के, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

Share Now

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज 17 जून रोजी दुपारी 1 वाजताचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे. या परिस्थितीत या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र घेऊन तयार राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच, रोल नंबर, आईचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.

अग्निपथ सैन्य भर्ती योजनेमुळे आजही देशात आंदोलन, रेल्वे देखील जाळली

यंदा दहावीचा राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. निकालात यंदा कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. कोकण विभागात 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून . यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

अग्निपथ भरती योजना: 10वी उत्तीर्ण ‘अग्निवीर’ना मिळणार डायरेक्ट 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली . त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९. २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *