क्राईम बिट

गर्लफ्रेंडने मागितली सोन्याची अंगठी म्हणून बॉयफ्रेंडने केला खून

Share Now

सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ताई सचिन निकम (32) असे मयत प्रेयसीचे नाव असून ती आधीच विवाहित होती. राहुल सर्जेराव पवार (31) असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव असून. ताईची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह कडेगाव येथील भिवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदीपात्रात फेकून देण्यात आला.

खा. शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील का ? विरोधकांच्या बैठकीत स्पष्ट केली भूमिका

याबाबत कडेगाव पोलिसांनी तपास करुन गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ 6 जून रोजी एक महिलेचा मृतदेह तरंगताना नागरिकांनी पाहिले. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी एक 25 ते 30 वयोगटातील स्त्रीचे प्रेत नदीपात्रात तरंगत असल्याचे दिसले. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने पोस्टमार्टम जागीच करण्यात आले.

पीएम किसान: अजून वेळ आहे, तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये येतील, फक्त हे काम करा

महिलेचे एका ज्वेलर्सच्या मालकासोबत अनैतिक संबंध असल्याचे कळले

कडेगाव पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मयताच्या वर्णनाशी मिळते जुळते वर्णनाचे मिसिंगबाबत माहिती घेतली. यानंतर खानापूर येथील बेपत्ता ताई सचिन निकम बलवडी हिचा हा मृतदेह असल्याची खात्री झाली. तर नोतवाईकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व पैंजण ओळखले. त्यानंतर सदर मयेतचा पती व नातेवाई यांच्याकडे चौकशी करुन अधिक माहिती घेतली असता मयत ताई निकम ही विटा येथे भाड्याच्या घरी राहत असल्याचे कळले. मयत महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती. महिलेबाबत कसून तपास केला असता मयत ताई निकम हिचे विटा येथील रेणुका ज्वेलर्स मालक राहुल पवार याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे कळले. तसेच मयत ताई निकम व राहुल पवार यांच्या कॉल हिस्ट्रीवरुन राहुल पवार यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

वडिलांना प्रेमसंबंधाबाबत सांगण्याची धमकी दिल्याने हत्या

गेल्या दिड वर्षापासून ताई सचिन निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली राहुलने पोलीस चौकशीत दिली. तिने 3 जून रोजी दुकानात वाढदिवासाकरीता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली. मात्र राहुलने अंगठी न दिल्याच्या कारणावरुन तिने प्रेम संबंधाबाबत त्यांच्या वडिलांना सांगेन असा दम दिला. याच कारणातून 5 जून रोजी राहुल मयत ताईला घेऊन कडेगावजवळ गेला. तिथे रस्त्याच्या कडेला चार चाकी गाडी थांबवून प्रेमसंबंधाबाबत वडिलांना सांगण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन गाडीतच ताईचा गळ्यातील ओढणीने गळा आवळला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदीपात्रात टाकून दिला. याबाबत राहुल पवार याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *