वैजापूरात “वट पौर्णिमा” उत्साहात साजरी
सुहासिनींचा अत्यंत जिव्हाळ्याचा मानला जाणारा “वट पौर्णिमा”हा सण शहर व परिसरात सुहासिनींनी वडाच्या झाडाला पवित्र व मंगलमय पांढरा धागा लपेटून जन्मोजन्मी आहे तोच पती मिळावा अशी प्रार्थना व पूजा “सत्यवान -सावित्री” यांचे स्मरण करून केली, येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात वडाचे झाड आहे येथे सकाळपासूनच सुहासिनी गटा-गटा ने येऊन ओटी भरुन व वडाच्या झाडाला पांढरा धागा बांधून पूजेत मग्न होत्या.
पोषक परसबाग उत्तम आरोग्यासाठी…. एकदा वाचाच
पाटील गल्ली, परदेशी गल्ली येथेही वडाच्या झाडांची मोठ्या भक्ती भावाने पूजा करून जन्मोजन्मी आहे तोच पती रहावा अशी प्रार्थना सुहासिनींनी आपल्या सुहासिनी पेहरावात केली,अत्यंत आनंद व उत्साहात हा सण शहर व परिसरात संपन्न झाला.
औरंगाबाद येथील कन्नड येथे सापडलेल्या बॉम्बचे गूढ पोलिसांनी ४८ तासात उकलले
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.