औरंगाबाद येथील कन्नड येथे सापडलेल्या बॉम्बचे गूढ पोलिसांनी ४८ तासात उकलले
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेरीस या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आहे. देवाणघेवाणाची व्यवहारात वाद झाल्यामुळे एका मित्राने आपल्याच मित्राच्या दुकानासमोर बॉम्ब लावल्याचे निष्पन्न झालं आहे.
कांद्याचा भाव: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल किमान भाव
औरंगाबादमधील कन्नड शहरामध्ये 9 जून रोजी मध्यवर्ती रोडच्या बाजूला कमी तीव्रता असलेला बॉम्ब सापडला होता. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे परिसरामध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरण कन्नड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिनेश राजगुरू यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दिनेश राजगुरू यांचं दुकान आहे. त्यांच्याच दुकानासमोर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव? उद्या होणार दिल्लीत बैठक
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथक तयार केले होते. त्यानंतर 48 तासात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना हा बॉम्ब लावलेल्या आरोपीला शोधण्यात यश आले आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे. यामध्ये रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे असे या आरोपीचे नाव आहे.
एका ब्लॉस्टिकच्या पाईपमध्ये रामेश्वरने बॉम्ब तयार केला होता. मोबाईलच्या खोक्यात हा बॉम्ब त्याने जितेंद्र यांच्या दुकानासमोर ठेवला होता. पण, याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने हा बॉम्ब निकामी केला होता. अखेरीस या प्रकरणाचा उलगडा झाल्यामुळे पोलीस यंत्रणेनं सुटकेचा श्वास सोडला. या प्रकरणी रामेश्वर मोकासेवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.